देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA ने NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. यंदा तब्बल 11 लाख 21 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा पात्रता मिळवली आहे. विशेष म्हणजे पात्र उमेदवारांमध्ये 58 टक्क्यांहून अधिक महिला विद्यार्थिनींचा समावेश आहे. NEET-UG 2026 मध्ये पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पंशुल बन्सल यांनी 720 पैकी 715 गुण मिळवत संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावलं आहे.