जळगावमध्ये विमानतळ ते गाडेगावदरम्यान कारचा भीषण अपघात झालाय.. भरधाव कार डिव्हायडरला धडकून अपघात झाल्याची माहिती आहे.. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर एक ते दोन जण गंभीर असल्याची माहिती मिळतीय. दरम्यान, कारमध्ये नेमके किती लोक होते याबाबत अद्याप स्पष्टता नाहीय.. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.. घटनास्थळी स्थानिकांकडून मदतकार्य सुरूय.