राज्यातील तरुणांसाठी मोठी संधी, मुंबईत विश्वविक्रमी रोजगार महाकुंभचा शुभारंभ । Mumbai job fair news
A major opportunity for the state's youth: World-record-breaking mega job fair launched in Mumbai | Mumbai job fair news
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात कोकण व नाशिक विभागातून होणार असून, या दोन्ही विभागांतील विविध तालुक्यांमध्ये ४१८ हून अधिक रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या रोजगार महाकुंभात १,५०० हून अधिक नामांकित कंपन्या व आस्थापनांचा सहभाग राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सकाळी १० वाजता एसएनडीटी सभागृहात या कार्यक्रमाला सुरुवात होईल