छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर याचा आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ समोर आलाय.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचं विधान सोलापूरकरनं केलं आहे. वेदात सांगितल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण आहेत. सब ब्रम्ह जानेती इति ब्राह्मण: म्हणजे अभ्यास करुन तो मोठा झालेला आहे. तसं त्या अर्थानं वेदानुसार भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात, असं वादग्रस्त वक्तव्य सोलापूरकरनं केलं आहे.