उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी वाहतूककोंडी पहायला मिळतेय.देशातील ही सर्वात मोठी वाहतूककोंडी असल्याचाही दावा करणअयात येतोय.महाकुंभकडे जाणाऱ्या रस्त्यावर 15 तासांहून अधिक वेळ वाहतूककोंडी आहे.कटनी, जबलपूर, मैहर आणि रेवा जिल्ह्यांमधील रस्त्यांवर हजारो कार आणि ट्रकच्या मोठ्या रांगा दिसत आहेत.वाराणसी, लखनऊ, कानपूर ते प्रयागराज जाणाऱ्या रस्त्यांवर २५ किलोमीटरपर्यंत जाम आहे.प्रयागराजच्या बाहेर ५० हजारांहून अधिक वाहने उभी आहेत. पेट्रोल आणि गॅसचाही तुटवडा आहे. संगम रेल्वे स्थानकाबाहेर जास्त गर्दी असल्याने स्टेशन बंद करण्यात आले.रेल्वे स्थानक 14 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.