लातूर जिल्ह्यात एक लाख 15 हजार इतक्या शेतकऱ्यांनी नाफेड कडे नोंदणी केली होती त्यात एक लाख पाच हजार शेतकऱ्यांना नाफेड कडून मेसेज पाठवण्यात आला होता.तर 6 फेब्रुवारीपर्यंत नाफेडची मुदत संपल्याने लातूर जिल्ह्यातले 40,000 शेतकरी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी प्रतीक्षेत आहेत.सरकारच्या हमीभाव केंद्राची मुदत संपून चार दिवस उलटले आहेत.मात्र शेतकऱ्यांना अजूनही सरकारने हमीभाव योजनेला मुदत वाढवून द्यावी अशीच अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जाते.एकीकडे हमीभाव केंद्राच्या बाहेर चार ते पाच दिवस प्रतिशत असूनही सोयाबीनची खरेदी केली नाही त्यामुळे शेतकरी हातात झालाय आता तो खुल्या बाजारामध्ये आपलं सोयाबीन विक्री करतोय. त्याच्या सोयाबीनला आता 3900 इतकाच कवडीमोल भाव मिळतोय.त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून हमीभाव आणि बाजार भाव यांच्या मधील फरक काढून सरकारने भावांतर योजना राबवावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते आणि या सगळ्यांचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी.