धुळ्यात राहणारा आणि मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा एक तरुण बेपत्ता झालाय.हा तरुण जहाजावरुन घसरुन समुद्रात पडल्याची माहिती कंपनीनं त्याच्या कुटुंबीयांना दिली.मात्र मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जहाजावर स्वतःची काळजी कशी घ्यायची, याचं प्रशिक्षण दिलेलं असतं.त्यामुळे पाय घसरुन पडल्यानं या तरुणाचा मृत्यू झाला असावा, यावर त्याच्या कुटुंबीयांचा विश्वास नाही.आणखी महत्त्वाचं म्हणजे या तरुणाचा जहाजावर झेंडा फडकवण्यावरुन वाद झाला होता.त्यानंतर दोन दिवसांत हा प्रकार घडलाय.त्यामुळे संशय वाढलाय.