एकनाथ शिंदेंनंतर आता त्यांचे मंत्री नाराज आहेत का असा प्रश्न विचारला जातोय.कारण या ना त्या कारणाने शिंदेंचे शिलेदार सरकारमध्ये असूनही नाराज दिसतायत.त्यात आता भर पडलीय उद्योगमंत्री उदय सामंतांची.जे उदय सामंत मुख्यमंत्र्यांबरोबर दावोसला गेले होते, जे उदय सामंत शिंदे गटातून फुटतील आणि भाजपबरोबर जातील, असं भाकीत वर्तवलं जात होतं आणि राज्याच्या राजकारणात उदय सामंतांचं वजन अचानक वाढलं होतं.त्याच उदय सामंतांनी नाराज होऊन अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलंय. खात्यातले अधिकारी परस्पर निर्णय घेतात अशी त्यांची तक्रार आहे.एकंदरीतच सध्या शिंदे गटातल्या मंत्र्यांच्या वाढत्या नाराजीची कारणं काय आहेत पाहुया.