अदाणी समूहाचे संस्थापक गौतम अदाणींनी सेवाभावाचं एक मोठं उदाहरण दिलंय.अदाणी समूह आणि मेयो हेल्थ क्लिनिक या अमेरिकन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मुंबई आणि अहमदाबाद या दोन्ही शहरात १ हजार खाटांचं प्रत्येकी एक अत्याधुनिक रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतलाय. अदाणी समूहातर्फे सुरु करण्यात आलेल्या ना नफा ना तोटा तत्वावर ही दोन्ही रुग्णलयं काम करतील. मेयो हेल्थ क्लिनिक हे जगातील सर्वात मोठं 'ना नफा ना तोटा' या तत्वावर चालणारं ग्रुप क्लिनिक आहे. दोन्ही रुग्णालयांसाठी मिळून अदाणी कुटुंब सहा हजार कोटी रुपये दान करणार आहे. मेडिकल कॉलेजमध्ये दरवर्षी १५० मुलांना शिक्षण देण्याची सोय असेल. शिवाय रुग्णालयात 80 निवासी डॉक्टरही रुग्णसेवेसाठी नेमले जाणार आहेत. या प्रकल्पाला अदाणी हेल्थ सिटी असं नाव देण्यात आलंय.