जळगावच्या यावल तालुक्यातल्या अट्रावल येथील मुंजोबाचा यात्रा महोत्सव सुरू झालाय.संपूर्ण माघ महिना हा यात्रा महोत्सव साजरा होतो.दरम्यान या यात्रा महोत्सवानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली असून दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.नवसाला पावणारा मुंजोबा म्हणून भाविकांची श्रद्धा असल्याने नवस फेडण्यासाठी ही राज्यभरातून भाविक या ठिकाणी दाखल झाले आहेत. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..