सोयाबिन खरेदीला केंद्र सरकारने मुदतवाढ दिल्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय.केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहानांनी याबाबत निर्णय घेतलाय.महाराष्ट्रात 24 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलीय.तर तेलंगाणात 15 दिवसांची मुदत वाढवली.दरम्यान, तूर दाळ, मसूर आणि उडद दाळीची खरेदी पुढील चार वर्ष सुरुच राहणार असल्याचीही माहिती मिळतीय.