उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय.. आज कोणाच्यातरी मागे घरंगळत जाताना तुम्हाला छान वाटेल... पण ज्यांच्यामागे तुम्ही घरंगळत जात आहात, ती लोकं उद्या तुमच्या नरडीला नख लावतील तेंव्हा तुम्हाला कळेल. तुमच्यात सद्सदविवेक बुद्धी आहे असं आम्ही मानतो, तिचा मान राखा. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेऊन तुमची स्वायत्तेतून येणारी शक्ती काय असते ही सत्ताधाऱ्यांना दाखवा.. महाराष्ट्राची जनता तुमची शतशः ऋणी राहील, असं या पत्रात लिहिलंय.मतदार यांद्यांतील गोंधळात बदल झाले नाही तर रस्त्यावर उतरणार, ठाकरे बंधूचं निवडणूक आयोगाला पत्र भाजपच्या मतदारसंघात गोंधळ नाही.. पण विरोधकांच्या वॉर्डातील मतदार याद्यामध्ये गोंधळ... आदित्य ठाकरेंचा आरोप.. तर बदल झाले नाही तर विरोधी पक्ष रस्त्यावर उतरणार... ठाकरेंचा इशारा