इस्रायलनं लेबनॉनच्या हिजबुल्लाहच्या तळांवर रविवारी हल्ला केला आणि त्यात हिजबुल्लाहचा कमांडर हैथम अली तबताबाई मारल्याचा दावाही केला. हिजबुल्लाहनं हा दावा फेटाळून लावला. आणि इस्रायली हल्ल्याचा कडाडून निषेध केला. हमाससह युद्धविराम सुरु असताना इस्रायलनं आता लेबनॉनकडे मोर्चा का वळवलाय. ज्या तबताबाईला मारल्याचा दावा इस्रायल करतंय तो कोण आहे. हमासनंतर हिजबुल्लाहला संपवण्याच्या नावाखाली आता इस्रायल लेबनॉनविरोधातही युद्ध सुरु करणार का... पाहूया एक रिपोर्ट