माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी परळीमधल्या प्रचारसभेत जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याची आठवण काढलीय. जगमित्र कार्यालय चालू आहे पण एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव आहे असं धनंजय मुंडे म्हणालेत. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यात आहे. वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी असून, तो सध्या बीडच्या कारागृहामध्ये आहे. धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीका होण्यास सुरुवात झालीय