राज ठाकरेंना शिविगाळ करणाऱ्या रिक्षा चालकाने माफी मागितलीय.. त्याने शिविगाळ केल्यानंतर त्याला अटक करण्यात आलीय. राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय... किरकोळ वादातून एका ऑटोचालकाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला.. विशेष म्हणजे हा रिक्षाचालक उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे..त्यानंतर मनसेनं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे... दरम्यान, अखेर त्या रिक्षा चालकाने कान पकडून माफी मागितलीय..