अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या अमेरिका फर्स्ट या त्यांच्या धोरणाने चांगलेच पछाडले गेलेत. त्यासाठी त्यांनी टॅरिफ धोरण लागू केलं अनेक देशांना दरडावून पाहिलं. आता त्यांनी मोठमोठ्या कंपन्यांना अमेरिकेतच उत्पादन करा यासाठी गळ घालायला सुरुवात केली आहे. अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या मोबाईल ची निर्मिती अमेरिकेतच केली पाहिजे असा त्यांचा हट्ट आहे. त्यामुळे नंतर आता सॅमसंग कंपनीलाही त्यांनी भारतासह इतर देशांमध्ये मोबाईल निर्मिती करू नका असं बजावलंय. नाहीतर थेट पंचवीस टक्के कर लावण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या निर्णयाचा आता भारतासह इतर देशांवर कसा परिणाम होणार? मोबाईल कंपन्यांना त्यांचा हा निर्णय मानवणार आहे का? पाहूया एक रिपोर्ट.