वाशिमच्या मानोरा तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला त्यामुळे लग्न समारंभात तारांबळ उडाली. पावसामुळे विवाहस्थळी पाणीच पाणी साचलं त्यामुळे वऱ्हाडींची मोठी गैरसोय झाली. दरम्यान या पावसाचा फटका शेतकऱ्यांचा सर्वसामान्यांनाही बसला आहे.