वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एका आयपीएस अधिकाऱ्यावर आरोपांची सरबत्ती होतेय. हे पोलीस अधिकारी म्हणजे जालिंदर सुपेकर वैष्णवीच्या सासरच्यांना मदत करणं, तिचे जाऊ, मयुरीच्या तक्रारीनंतर तिला धमकावणं, तुरुंगातल्या खरेदी संदर्भातला एक घोटाळा आणि एक आत्महत्या प्रकरण अशा बऱ्याच प्रकरणांशी जालिंदर सुपेकरांचं नाव जोडलं जात आहे. अंजली दमानिया यांनी तर जालिंदर सुपेकर यांची एक ऑडिओ क्लिपच सादर केली आहे. बघूया जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी कशा वाढलेल्या आहेत.