पालघरच्या मनोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या सातिवली गावात अघोरी पुजा आणि जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आलाय.. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अघोरी पूजा आणि जादूटोण्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र त्या आधीच अघोरी पूजा करणाऱ्या मांत्रिकाने घटनास्थळावरून पळ काढला. तर पूजेत सहभागी असलेल्या अशोक बात्रा याने ग्रामस्थांसोबत हुज्जत घालून अरेरावीची करत घटनास्थळावर निघून गेला. घटनास्थळी अघोरी पूजेसाठी पिठाची बाहुली,लिंबू,चाकू, पांढरी टोपी, बिडी - सिगरेट, कोंबड्याची पिसे,अबीर, गुलाल आणि अगरबत्ती आदी साहित्य आढळून आले आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत सातिवली ग्रामस्थांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी..