ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची ज्येष्ठता सोडून दिलीय, विखे पाटलांची Sharad Pawar यांच्यावर हल्लाबोल| NDTV

मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर टीका केली.ज्येष्ठ नेत्यांची त्यांची ज्येष्ठता सोडून दिलीय.. वयाने ज्येष्ठता येत नाही, असा घणाघात राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर केलाय.पवारांनी कशा पद्धतीने निवडणुका फिरवल्या हे मला लोक सांगतात अशी टीका विखे पाटलांनी केलीय. मत पेट्या कशा तयार व्हायच्या, कशा बदलल्या गेल्या, बदलणाऱ्या अधिकाऱ्यांना कशी बक्षीस दिली हे लोकांनी मला सांगितलं.त्यांनी पूर्वीच्या काळी भानगडी केल्या त्यामुळे त्यांना वाटतं आता प्रत्येक निवडणुकीत भानगडीत होतात.धाराशिव दौरावर असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा तुळजापुरातून शरद पवारांवर हल्लाबोल

संबंधित व्हिडीओ