गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दादरच्या कबुतरखान्यावरुन आता पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे.दादरमधील कबुतर खान्यावर पुन्हा ताडपत्री टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेकडून बांबू आणि ताडपत्री लावण्याचं काम सुरू झालंय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हायकोर्टाच्या निर्देशानंतर या कबुतरखान्यावर या आधीही बांबू आणि ताडपत्री टाकण्यात आली होती. पण जैन समूदायाच्या लोकांनी आंदोलन करुन ती ताडपत्री काढली होती. आता पुन्हा एकदा या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात येत आहे.याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी.