Khed| कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या महिलांच्या गाडीचा अपघात; तीन महिलांचा मृत्यू, 20 महिला जखमी | NDTV

खेड तालुका देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार तर 20 जण जखमी झालेत.. खेड तालुक्यातील कुंडेश्वर शिव मंदिराकडे जाताना ही घटना घडली.दर्शनासाठी जात असताना वाहन दरीत कोसळून हा अपघात झाला. पापळवाडी येथील काही महिला दर्शनासाठी कुंडेश्वर येथे जात असताना, घाटातून प्रवास करताना त्यांची गाडी दरीत पलटी झाली. अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 30 ते 35 महिला प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी खेड पोलीस स्टेशनकडून तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित व्हिडीओ