कृषी विभागाकडून दुष्काळाचे पंचनामे करण्यासाठी ‘फॅार्मेट’ जारी करण्यात आले आहेत.. या फॅार्मेटनुसार पिकाचे पंचनामे करताना 12 प्रकारची माहिती भरावी लागणार आहे. 265 तालुक्यांतील पंचनामे करण्यासाठी एकच नमुना अर्ज असेल तर पंचनाम्याच्या शेवटच्या रकाण्यात शेतकऱ्यांची सही अनिवार्य असेल. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सही अनिवार्य असल्याने बोगस पंचनाम्याना आळा बसेल अशी अपेक्षा आहे.