Amravati मध्ये दुष्काळाचा मोठा फटका, रब्बी हंगामाचा पेरा घटला; केवळ 42 हजार हेक्टरवर पेरण्या

संपूर्ण अमरावती जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला, खरीप हंगाम 50 टक्के पेक्षा जास्त उध्वस्त झाल्यानंतर रब्बी हंगामाकडे शेतकऱ्यांचे लक्ष होतं.. मात्र धरणात पाणी नाही, तसेच विहिरीची पातळी देखील प्रचंड घटली त्यामुळे सिंचन करण्यासाठी शेतकऱ्याकडे कुठलाही पर्याय नाही.. परिणामी याचा थेट परिणाम रब्बी हंगामावर झाला, आतापर्यंत केवळ 42 हजार हेक्टर वरच रब्बी हंगामाचा पेरा झाला.. दीड लाख हेक्टर वर रब्बी हंगामाचे प्रस्तावित क्षेत्र असताना केवळ ३२ हजार हेक्टर हरभऱ्याची पेरणी झाली आणि 8 हजार हेक्टर वर गहू पिकाची पेरणी झाली.. तर ५० ते ५० टक्क्यांच्या वर रब्बी हंगामाचा पेरा जाणार नाही अशी भीती जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांनी व्यक्त केली..

संबंधित व्हिडीओ