अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथे ह्रदय पिळवून टाकणारी घटना घडली असून एकाच कुटुंबातील 5 जणांनी आपलं जीवन संपवलं आहे.विशेष म्हणजे, वडिलांनी आपल्या लहान मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. एका शेताच्या बाहेर दुचाकी लावल्याचंही पाहायला मिळालं.बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या 4 अपत्यांसह जीवन संपवल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान या घटनेनंतर घरातल्या महिलेनं देखील फोन बंद करुन ठेवला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मुलांची आई शिला काळे हिला पोलीसांनी संपर्क केला असता तिने मुलं गेली मी जगून काय करु असं फोनवरून म्हटलं.त्यानंतर तीने आपला फोन बंद केल्याच सांगण्यात येतं.ती येवला येथे असल्याच तीनं सांगितलं होत मात्र अद्यापपर्यंत तिचाही संपर्क होवू शकला नाही.