Prapanch| NDTV मराठी| मटण विक्री बंदी योग्य की अयोग्य?, नवा शो.. प्रपंच, न्यूजरुम कशी विचार करते?

आम्ही तुमच्यासाठी एक नवा शो घेऊन आलोय. त्याचं नाव आहे एनडीटीव्ही प्रपंच. अनेक कीर्तनकारांकडून तुम्ही प्रपंच हा शब्द ऐकला असेल. त्याचा अर्थ आहे विस्तार, फैलाव. मराठीमध्ये हा शब्द संसारीक व्यवहार या अर्थानं जास्त वापररला जातो. आम्ही न्यूजरुममध्येही येणाऱ्या बातमीवर, माहितीवर प्रपंच करत असतोत. चर्चा, वाद-विवाद, मतमतांरे अगदी खडाजंगी सुद्धा होते. त्याचीच एक झलक तुम्ही एनडीटीव्ही प्रपंचमध्ये पहायला मिळणार आहे. 15 ऑगस्टला महानगरपालिकांनी मांसविक्रीवर बंदी आणली.. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच लोकांच्या खानपानाच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा निर्णय योग्य होता का? त्याच्यावरचा हा एनडीटीव्ही मराठीच्या न्यूजरुमचा प्रपंच.

संबंधित व्हिडीओ