Ahilyanagar| MHT-CET परीक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, विद्यार्थ्यांची गोपनीय माहिती लीक झाली?

राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाणारी एमएचटी-सीईटी परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. २०२४ पासून परीक्षेच्या प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, विद्यार्थ्यांची गोपनीय माहिती खासगी शैक्षणिक संस्थांकडे पोहोचत असल्याचा दावा करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये आणि गुणवत्ता यादीत फेरफार झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अहिल्यानगरमध्ये तोफखाना पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, परीक्षा केंद्रे, संगणकीय नोंदी, उत्तरपत्रिका आणि सीसीटीव्ही फुटेजची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ