Nepal Flood| नेपाळमध्ये पूर, 6 दिवसांनंतरही परिस्थिती जैसे थे; लोकांच्या शोधात नातेवाईकांची धडपड

सहा दिवस उलटलेत तरी नेपाळची परिस्थिती जैसे थै आहे. नुवाकोट येथील हेलिपॅडवर पुराच्या आपत्तीला ६ दिवस उलटून गेल्यानंतरही, लोक कागदावर छापलेले फोटो हातात घेऊन आपल्या बेपत्ता नातेवाईकांचा शोध घेत आहेत.यातच, झारखंडच्या रांची येथील रहिवासी असलेले घोष कुटुंब आपल्या बेपत्ता भावाच्या शोधात नेपाळमध्ये ठिकठिकाणी भटकत आहे. राम प्रसाद घोष असे या बेपत्ता व्यक्तीचे नाव असून, ते येथील एका पॉवर प्लांटमध्ये 'ॲडमिन' पदावर कार्यरत होते. दरम्यान, नेपाळमध्ये हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सातत्याने मदत पोहोचवली जात आहे.याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी रणवीर सिंग यांनी पाहुयात

संबंधित व्हिडीओ