राज्य सरकारच्या प्रस्तावित कोचिंग क्लासेस नियमावलीविरोधात लातूरमध्ये खाजगी क्लास चालकांनी आंदोलन पुकारलं आहे. प्रस्तावित नियमावलीतील काही अटी जाचक असून त्यामुळे क्लासेसच्या कामकाजावर परिणाम होणार असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात येत आहे.या नियमांचा फेरविचार करून जाचक अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी क्लास चालकांनी धरणे आंदोलन सुरू केलं आहे.