Jalna News l आंदोलनामुळे अंतरवालीचं चित्र कसं बदललं? गावकऱ्यांचं जगणं बदललं l Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी हे छोटंसं गाव राज्याच्या राजकीय नकाशावर ठळकपणे झळकलं. २०२३ मध्ये आंदोलन सुरू झालं तेव्हा गावात चहाची साधी टपरीही शोधणं कठीण होतं. मात्र आंदोलनासाठी राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे गावाची अर्थव्यवस्थाच बदलून गेली. आज अंतरवालीच्या रस्त्यालगत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हॉटेल्स आणि विविध व्यावसायिक उपक्रम उभे राहिले आहेत. आंदोलनामुळे स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. अंतरवालीतील याच बदललेल्या खाऊ गल्लीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी. How did the agitation change the face of Antarwali?

संबंधित व्हिडीओ