Beed| मुलींच्या शिक्षणासाठी 47 वर्षीय आईची जिद्दीची दौड, अनवाणी धावत रमाबाई रणवीर प्रथम

अंगावर साधी साडी, पायात स्लीपर आणि मनात मुलींच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्नं... अशा परिस्थितीत बीड जिल्ह्यातील एका ४७ वर्षीय आईने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मॅरेथॉन स्पर्धा जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अंबाजोगाईच्या रमाबाई रणवीर यांनी ‘अमृत दौड’ मॅरेथॉनमध्ये सहभागी होत स्लीपर निसटल्यावर अनवाणी पायाने धावण्याचा निर्णय घेतला आणि अनेक तरुण स्पर्धकांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

संबंधित व्हिडीओ