OBC मोर्चाला आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली; नवनाथ वाघमारेंचे ओबीसी मोर्चा रद्द करण्याचं आवाहन

मुंबईतल्या आझाद मैदानावरचा 1 सप्टेंबर रोजी म्हणजे उद्या होणारा सकल ओबीसी समाजाचा मोर्चा रद्द करावा, असं आवाहन ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलंय. या मोर्चासाठी राज्यभरातून ओबीसी समाज बांधव सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या मोर्चाला आझाद मैदान पोलिसांनी कायदेशीररीत्या परवानगी नाकारली आहे. याच पार्श्वभूमीवर वाघमारेंनी मोर्चा रद्द करण्याचे आवाहन केले आहे. परवानगी नाकारल्यानंतर हा मोर्चा कायद्याच्या विरोधात होईल, अशा मोर्चात सहभागी झाल्यास ओबीसी समाजातील गोरगरीब नागरिक आणि नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याचेही वाघमारे म्हणाले. त्यामुळे तरुणांनी आणि समाजबांधवांनी विचार करून मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केलंय. Azad Maidan police denied permission for the OBC Morcha.

संबंधित व्हिडीओ