Pune| PM Modi यांचा फोटो हटवल्याप्रकरणी Amit Thackeray यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

पुण्यातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमधील एका फोटोवरून राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप घेत तो हटवण्यास सांगितलं होतं. मात्र आता तोच फोटो कॉलेज प्रशासनानं पुन्हा लावलाय, भाजप कार्यकर्ते हा फोटो लावायला जाणार होते पण त्याआधीच कॉलेज प्रशासनाने हा फोटो पुन्हा त्या जागेवर लावला. दरम्यान याच भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या गुणवत्तेवरूनही अमित ठाकरे यांनी अधीक्षकांना सुनावलं. अमित ठाकरेंनी फोटो काढला यावरूनच आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. Pune | Process underway to register a case against Amit Thackeray for removing PM Modi's photo.

संबंधित व्हिडीओ