अकोल्यातील बहुचर्चित मनीष म्हात्रे तिहेरी हत्याकांड प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. गर्भवती पत्नी आणि ९ वर्षीय मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी मुख्य आरोपी मनीष किसनराव म्हात्रे याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यादरम्यान काही साक्षीदार फितूर झाले होते. मात्र सरकारी पक्षाने केलेला प्रभावी युक्तिवाद तसेच तपास अधिकारी बहुरे यांनी गोळा केलेले सबळ पुरावे यामुळे आरोपीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला.
Akola | Accused sentenced to death in Manish Mhatre triple murder case; historic verdict by District and Sessions Court.