चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात ध्वनी प्रदूषणाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 डीजे संचालकांवर नियमभंगाप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे डीजे चालक आणि आयोजकांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील काळात ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. याबाबत मुल पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी माहिती दिली.
Chandrapur | Action taken against two DJs for exceeding noise limits in Mul taluka for the first time.