Nandurbar Rain| बोरद परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, रस्त्यांना नदीचे स्वरूप, जनजीवन विस्कळीत

नंदुरबार जिल्ह्यात एकीकडे उष्णतेने नागरिक हैराण झाले असताना, दुसरीकडे सातपुडा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात गेल्या तासाभरापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून काही रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे अनेक शेतीपिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सातपुडा परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. Nandurbar Rain | Torrential rain accompanied by gusty winds in the Bord area; roads turned into rivers, disrupting normal life.

संबंधित व्हिडीओ