जेलमधून बाहेर आल्यानंतर रील स्टार संतोष पंडित पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. यावेळी त्यांनी पुणे शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेचा मुद्दा उपस्थित करत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. शहरातील खराब रस्ते आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी या व्हिडीओमधून केला आहे. व्हिडीओमध्ये पुणे शहरातील रस्त्यांची अवस्था दाखवत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही संतोष पंडित यांनी केली आहे.
Reel star Santosh Pandit active again after release from jail; what’s in Pandit’s new video?