सर्वांचा लाडका गणराया आपल्या सगळ्यांच्या घरी विराजमान आहे.गणेशोत्सवाचा आजचा 9वा दिवस आहे. आज आपण देवा श्री गणेशा या आमच्या विशेष कार्यक्रमातून राज्यभरातील गणपतीचं दर्शन घेउयात. गणांचा स्वामी, बुद्धीचा देवता, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणनायकांची 10 दिवस आपण मनोभावे पूजा अर्चना करणार आहोत. देवा श्री गणेशा या विशेष कार्यक्रमातून NDTV मराठी आपल्याला राज्यभरातील गणपतींचं दर्शन घडवणार आहे.