पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आज दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत असतानाच सायंकाळी पाच वाजल्यापासून पावसाने जोर धरला आणि अनेक भागांमध्ये चांगला वर्षाव झाला.
या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दीर्घकाळाच्या पावसाअभावी पिकांवर ताण येत होता.
Pune Rain | Rain returns to Indapur after a month and a half; relief for farmers worried by the dry spell.