Akola Heat Wave| उष्णतेचा कहर, पारा कायम 43 अंश, नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला

अकोल्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत.. मागील तीन दिवस जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता, तर काल तापमान तब्बल 43.4 अंश सेल्सिअसवर पोहोचले. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून काहींना चेहरा व त्वचेचे संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

संबंधित व्हिडीओ