नगरसेवक Mateen Patel ची 6 तासांपासून SIT कडून कसून चौकशी; याचसंदर्भातले अधिकचे अपडेट्स | Nida Khan

निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी MIM नगरसेवक मतीन पटेलची गेल्या सहा तासांपासून कसून चौकशी सुरुय. मतीन पटेल आणि घरमालक हनीफ शेखची समोरासमोर बसून चौकशी होतीय.. दरम्यान, मतीन पटेलचा मोबाईल देखील एसआयटीने ताब्यात घेतलाय.या चौकशीत मतीन पटेलवर अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरुये... त्याचबरोबर SIT कडून काही जबाब नोंदविले असल्याची माहितीही मिळतीय. निदा खान फरार असताना ती कुणाच्या माध्यमातून संपर्कात आली, याबाबत मतीनकडून माहिती घेतली जातेय.तर मतीनने घर मालकाकडून चावी निदा खानला दिल्याचा जबाबही त्याने दिला.निदा खानला आर्थिक रसद कशाप्रकारे पुरवली याचे बँकेतील व्यवहार मिळवण्याचं काम सुरूय, त्याचबरोबर यात कोणत्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून मदत केली याचा देखील SIT शोध घेत आहे.

संबंधित व्हिडीओ