Chh. Sambhajinagar| Shivsena उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्केंवर जीवघेणा हल्ला

छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.बाबा पेट्रोलपंप चौक परिसरात गळाभेटीच्या बहाण्याने आरोपीने त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.रविवारी रात्री उशिरा आरोपी राम बोडखे याने अंबादास म्हस्के यांना फोन करून भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर बाबा पेट्रोलपंप चौकात भेट झाल्यानंतर “मजाक करत होतो” असे म्हणत आरोपीने गळाभेट घेत अचानक चाकूने गळ्यावर वार केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत म्हस्के यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संबंधित व्हिडीओ