20 दिवस पाणीपुरी खाल्ल्यास किडन्या फेल होतात, Shivraj Motegaonkar चा नवा Video Viral

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या शिवराज मोटेगावकर यांचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे... या व्हिडिओमध्ये मोटेगावकर पिझ्झा हे डुक्कर आणि कुत्र्याचं खाद्य असल्याचा दावा करताना दिसत आहेत... तसेच सलग वीस दिवस पाणीपुरी खाल्ल्यास दोन्ही किडन्या फेल होतात, असं सायन्स सांगत असल्याचंही ते म्हणताना दिसत आहेत... इतकंच नाही तर पाणीपुरी आवडणाऱ्यांनी मागच्या जन्मी आपण भिकारी होतो असं समजावं, असं वक्तव्यही त्यांनी केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे... या व्हिडिओनंतर मोटेगावकर नेमकं क्लासमध्ये विद्यार्थ्यांना काय शिकवत होते, असा सवाल आता सोशल मीडियातून उपस्थित केला जात आहे.

संबंधित व्हिडीओ