Shirdi| फुलभांडारांच्या नावाखाली उघड लूटमार; दुकानं थेट सील, शिर्डी नगरपरिषदेकडून मोठी कारवाई

साईनगरी शिर्डीत साईभक्तांच्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांविरोधात आता प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आलंय.साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची फुलं, हार आणि प्रसादाच्या नावाखाली सर्रास आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारीनंतर शिर्डी नगर परिषदेनं मोठी कारवाई सुरू केलीय. काही फुलभांडार दुकानांमध्ये हार, फुलं आणि प्रसादाच्या वस्तू चढ्या दराने विकून भाविकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचं समोर आलंय. भाविकांना हजारोंचा गंडा घालणाऱ्या फुलभांडार दुकानांवर आता थेट टाळे ठोकण्याची कारवाई होत असून नियम मोडणाऱ्यांना दंडासह दुकान बंद ठेवण्याची शिक्षा दिली जातेय.

संबंधित व्हिडीओ