अकोल्यातील तेल्हारा तहसील कार्यालयावर आज शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा धडकला. विविध मागण्यांसाठी काढलेल्या या आसूड मोर्चात शेकडो शेतकरी आणि मजुरांनी सहभाग घेतला.
संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपयांची तर मजुरांना ५० हजार रुपयांच्या मदतीची प्रमुख मागणी करण्यात आली.