रशियातून समोर आलेल्या एका घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे... प्लेगसारख्या घातक आजारावर संशोधन करणाऱ्या २८ वर्षीय संशोधकाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे... गंभीर न्यूमोनियाची लक्षणे दिसल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर शेकडो लोकांना क्वारंटाईन करण्यात आले... या प्रकरणामागे प्रयोगशाळेतील संसर्गाचा धोका आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे... जरी रशियन अधिकाऱ्यांनी व्यापक उद्रेक झाल्याचे नाकारले असले, तरी या घटनेने पुन्हा एकदा जैवसुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आणले आहेत... पाहूया हा विशेष रिपोर्ट...