Kalyan Accident| भरधाव कारची 4 ते 5 वाहनांना धडक, संतप्त जमावाकडून कारची तोडफोड, कारचालक ताब्यात

कल्याणच्या सहजानंद परिसरात भरधाव कारने धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे.. कारने रस्त्यावरील चार ते पाच वाहनांना धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत दोन ते तीन जण जखमी झाल्याचं समोर येत आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कार चालकाला पकडत वाहनाची तोडफोड केली. दरम्यान, महात्मा फुले पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

संबंधित व्हिडीओ