बातमी २०२६च्या नोबेल पुरस्कारांची.यंदाचा पहिला नोबेल जाहीर झालाय. वैद्यकशास्त्र किंवा फिजिओलॉजी अर्थात मेडिसिनमधील २०२६चा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. अमेरिकन शास्त्रज्ञ कार्ल डाइसेरोथ, जर्मन पीटर हेगेमान आणि जॉर्ज नागेल या तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे.स्वीडनच्या स्टॉकहोममधील 'करोलिंस्का इन्स्टिट्यूट'च्या नोबेल असेंबलीने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी या विजेत्यांची घोषणा केली.प्रकाश-सक्रिय आयन चॅनेल आणि ऑप्टोजेनेटिक्स या क्षेत्रातील संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या संशोधनामुळे शास्त्रज्ञांना प्रकाशाच्या मदतीने जिवंत मेंदूतील विशिष्ट मज्जापेशींची क्रिया चालू किंवा बंद करणे शक्य झाले आहे. यामुळे मेंदूचे कार्य, स्मृती, भावना आणि मज्जासंस्थेचा अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये मोठी क्रांती झाली आहे. या पुरस्काराअंतर्गत विजेत्यांना सुमारे ११ कोटी ५५ लाख ६४ हजार,५०० कोटी रुपये देण्यात येतील.