गणेशोत्सवासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने गणेशोत्सवाच्या काळात परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. यावर आशिष शेलार यांनी मुख्य सचिवांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, गणेशोत्सवाला राज्यमहोत्सव घोषित केल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.