Shani Shingnapur Darshan | शनी अमावस्या आणि शेवटचा श्रावण शनिवार, दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथे श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस आणि शनी अमावस्या आल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात आले होते. सर्व भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी शनी चौथऱ्यावरील प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. सुमारे पाच लाख भाविक दिवसभरात दर्शन घेतील असा अंदाज मंदिर प्रशासनाने व्यक्त केला आहे. 'जय शनिदेव' आणि 'सूर्यपुत्र शनिदेव महाराज की जय' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

संबंधित व्हिडीओ